अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात धाडसत्र सुरू झालं. आजतागायत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.

नुकतेच ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

अरमानच्या घरावर शनिवारी 29 ऑगस्ट रोजी एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता आणि यावेळी अभिनेत्याच्या घरातून ड्रग्ज सापडले होते.

अरमान व्यतिरिक्त ड्रग पेडलर अजय सिंगलाही अटक करण्यात आली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सिंग हा हिस्ट्री शीटर आहे आणि कोहलीचे नाव चौकशी दरम्यानच समोर आले.

अहवालांनुसार, कोहली आणि सिंग व्यतिरिक्त, एनसीबीने ड्रग्स प्रकरणात आणखी 4 लोकांना अटक केली आहे, ज्यात 2 नायजेरियन नागरिक होते. सध्या एनसीबी बाकीच्यांचीही चौकशी करत आहे.

दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर एनसीबीने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापेमारी करण्यात आली. मुंबई विभागाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली. त्याच्या घरात ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीने आपली कारवाईचा फास अधिक आवळला आहे.