Breaking : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री पद सोडायला तयार”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या वेगळेच वळण घेताना दिसत आहे. शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेली बंडखोरी आणि शिवसेनेच्या नेत्यांचा पाठिंबा यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सध्या कोलमडत असल्याचे दिसत आहे या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह (Facebook Live) द्वारे संवाद साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना बाळासाहेबांची आहे का शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का मुख्यमंत्री भेटत का नव्हते. मुख्यमंत्री भेटत नव्हते काही दिवसांपूर्वी सत्य होतं.

कारण माझी शस्त्रक्रिया झाली. अनुभव सांगणार नाही. पण दोन ते तीन महिने मी भेटू शकत नव्हतो. हा मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली आहे. मी भेटत नव्हतो पण कामं थांबली नव्हतं.

शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य एकनाथ शिंदे आमदार खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल.

आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही.

बाळासाहेब गेल्यानंतर 2014ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच होतो. तेव्हा 63 आमदार आले. तेव्हाही मंत्री होतो. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा. असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेचे आमदारा गायब सुरतला गेले. गुवाहाटीाला गेले. त्यात मला पडायचं नाही. परवा निवडणूक झाली. त्यावेळी आमदार हॉटेलात होते.

मी म्हटलंही कोणती लोकशाही आहे.आपली माणसांना एकत्रं ठेवावं लागतं. अरे हा कोठे गेला तो कुठे गेला. त्यावर शंका घेतली जात होती. लघवीला गेला तरी शंका घेतो. म्हणजे लघुशंका.

मला काहीच अनुभव नव्हता. पण जे काही घडलं. मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रगणागणात उतरलो.

मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, या आणि माझा राजीनामा घेऊन जावा तसेच वाटल्यास मी पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे तुम्ही इथे येऊन मला सांगा असं भावनिक आव्हान बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांनी केले आहे.