Business Idea : गावातच सुरु करा ‘हा’ हिट व्यवसाय, दरमहा होईल 30 ते 40 हजारांची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : अलीकडच्या काळात व्यवसाय सुरु करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कारण व्यवसायात नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येते. विशेष म्हणजे अनेकजण तर नोकरी सोडून व्यवसाय सुरु करतात. यात त्यांना प्रचंड नफाही मिळतो.

आता तुम्ही तुमच्या गावातच काही व्यवसाय सुरु करू शकता. आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही खूप कमी खर्चात प्रत्येक महिन्याला सहज 30 ते 40 हजारांची कमाई करू शकता. व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला सरकारही मदत करेल. जाणून घ्या सविस्तर.

मधमाशी पालन-

बाजारामध्ये मधाला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते. मधाची किंमत बाजारात जास्त आहे. त्यामुळे गावातील मधमाशीपालन हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.

शेळीपालन-

शेळीपालन हा व्यवसायदेखील एक फायदेशीर व्यवसाय असून शेळीचे दूध आणि मांस या दोन्हींना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करून चांगला पैसा मिळवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एक फॉर्मची गरज पडेल.

सेंद्रिय खते-

अनेकजण रसायनयुक्त अन्नापासून दूर राहत आहेत. अनेकांना तर रासायनिक खतांनी पिकवलेल्या भाज्या आवडत नाहीत. अशा परिस्थितीत आता तुम्ही सेंद्रिय खत बनवून ते शेतकरी किंवा कंपन्यांना विक्री करून चांगली कमाई करू शकता.

खत बियाणे-

खरंतर शेतकऱ्यांना बी-बियाणे किंवा खत घेण्यासाठी शहरात जावे लागते. समजा माल त्यांना गावातच मिळू लागला, तर त्यांना दुसरीकडे जावे लागणार नाही. त्यातून तुम्हाला चांगली कमाई करता येईल. परंतु या व्यवसायासाठी तुम्हाला परवाना घ्यावा लागणार आहे.

पिठाची गिरणी-

खेड्यातील लोक क्वचितच पॅकेज केलेले अन्न खात असून त्यांना कच्चे धान्य स्वतः दळून तयार करायला आवडते. त्यामुळेपिठाची गिरणीचा हिट व्यवसाय ठरू शकतो. महत्त्वाचे म्हणजे या गिरणीत केवळ गहूच नाही तर तेलही काढता येते.

चहाचे दुकान-

चहाचा व्यवसाय कुठेही चालू करता येतो. देशभरात चहा व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून हे काम करत आहेत.

माती परीक्षण प्रयोगशाळा-

आता तुम्ही हा व्यवसाय सरकारी मदतीतून चालू करू शकता. त्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावेत. तर तुम्ही माती परीक्षण प्रयोगशाळा चालू करू शकता.

मत्स्यपालन-

या व्यवसायामध्ये तुम्हाला सरकारी मदत मिळेल. खेड्यापाड्यात पूर्वीपासून मत्स्यपालन व्यवसाय प्रचलित असून आता सरकारी मदतीमुळे ते जास्त परवडू लागले आहे.