वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  संगमनेरात सुरु असलेल्या वाळु तस्करीने काल रात्री एका अडीच वर्षीय बालकाचा बळी घेतला. तर पित्यासह सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.(sand smuggler)

या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन तासापेक्षा अधिक वेळ पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या दिला होता. मोहम्मद इब्राहीम शेख (वय अडीच वर्ष) असे अपघातालील मृत बालकाचे नाव आहे.

तर इब्राहीम मुनीर शेख या पित्यासह दुसरा मुलगा सात वर्षीय मुलगा या घटनेत गंभीर जखमी झाले. इब्राहीम शेख आपल्या दोन मुलांसह सय्यदबाबा चौक येथे दुचाकीवरून दूध आणण्यासाठी जात होते.

यावेळी कोल्हेवाडीकडून संगमनेरच्या दिशने बेदरकारपणे आणि भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले.

दुचाकीवर पुढे बसलेला अडीच वर्षीय मोहम्मद हा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर बापलेक गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर अपघातस्थळी मदत करण्याऐवजी ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर सोडून देत घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिक नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

मात्र अतिरक्तस्त्रावामुळे अडीच वर्षीय बालकाचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला होता. याप्रकरणी पोलीसांनी ट्रॅक्टर चालक मंगेश शितोळे (रा. संगमनेर खुर्द) याच्यासह ट्रॅक्टर मालक शफीक एजाज शेख (रा. लखमीपुरा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.