राज्यात प्रथमच पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक लोणी येथे क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा अभ्यासक्रम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा आणि मेकॅट्रॉनिक्स हे दोन नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी परवानगी दिली असल्याची माहीती तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली.

सातत्याने नविन तंत्रज्ञान विकसित होत असून विविध कंपन्यांमधून आवश्यक असलेल्या नविन तंत्रज्ञानाने विकसित असलेले विद्यार्थी तयार होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून काल सुसंगत असणाऱ्या उदयोन्मुख अभ्यासक्रमांना या वर्षीपासून चालना दिली आहे.

राज्यात फक्त विखे पाटील तंत्रनिकेतन येथे यावर्षीपासून क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा अभ्यासक्रम सुरू केला आहे. जी-मेल, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स यावर डेटा साठवीला जातो.

मोठ्या कंपन्यांना एकाच वेळी अनेक ग्राहकांना सेवा सुरळीतपणे पुरविण्यासाठी मोठमोठे सव्‍‌र्हर मशीन्स एकाच वेळी चालविणे क्लाऊडमुळे सोपे झाले आहे. यामुळे तंत्रज्ञानात नवीन क्रांती होत आहे.

माहिती तंत्रज्ञानातील नवा अध्याय असलेल्या ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. मेकॅट्रॉनिक्स या अभ्यासक्रमात मेकॅनिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स या दोन अभ्यासक्रमांचा समन्वय साधलेला आहे.

नव्या तांत्रिकयुगाशी सुसंगत असल्याने या अभ्यासक्रमाला देखील मोठी पसंती मिळत आहे. आपले करियर घडविण्यासाठी दहावी पास विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी सांगितले.