रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना आ. संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मिळाली मायेची ऊब

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- थंडीपासून बचाव करायचा असेल तर सर्वच जण निवडतात तो स्वेटर, मफलर अथवा अंगावर पांघरण्याची शाल अन् रग. मात्र, ज्यांच्याजवळ रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठीदेखील दोन पैसे नाहीत.

अथवा ज्यांना आपलं घरदार नाही अशा निराधारांना कसली आली मफलर, शाल अन् रग. अशाच थंडीत कुडकुडत रस्त्यावर झोपणाऱ्या निराधार वृद्धांना थंडीच्या व पावसाच्या दिवसात संरक्षण करण्यासाठी ऊब देणारे

ब्लॅंकेट वाटताना मायेची ऊब देण्याचे काम आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली वतीने करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी शहरात माळीवाडा बस स्थानक परिसर,स्वस्तिक चौक, स्टेशन रोड परिसरात थंडीची व पावसाची झळ सोसत झोपलेल्यांच्या

अंगावर ब्लॅंकेट पांघरून मायेची उब दिली.अचानकपणे मिळालेल्या या भेटीमुळे गरजवंतांनी आनंद व्यक्त केला. निराधारांना आधार देणार्‍या उपक्रमाची आज खरी गरज आहे.

शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे वैभव ढाकणे यांनी केले सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन देखील

त्यांनी यावेळी केली या कार्यामध्ये त्यांच्यासमवेत वैभव ढाकणे शहरजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, ऋषिकेश गवळी ,जय सानप ,ओमकार कापरे ,विकी हुरुळे, अमोल ठाणगे ,गणेश दिवटे, भाऊसाहेब वनवे आदी उपस्थित होते.