कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी स्वतंत्र वकील कक्षाचा प्रारंभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- शहरातील जुने जिल्हा न्यायालयात सुरु असलेल्या कौटुंबिक न्यायालयात महिला वकिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्वतंत्र बार रूमचा शुभारंभ कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक यांच्या हस्ते झाला.

यावेळी अहमदनगर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. भूषण बर्‍हाटे, सेंट्रल बारचे ऍड. सुभाष काकडे, वकील संघाच्या महिला सचिव ऍड. मीनाक्षी कराळे, केंद्र सरकारचे ऍड. सुभाष भोर, विशेष सरकारी वकील ऍड. सुरेश लगड, ऍड. शिवाजी कराळे,

कार्यकारणी सदस्य ऍड. सुनिल तोडकर, ऍड. अनिता दिघे, ऍड. अनुराधा येवले, ऍड. वृषाली तांदळे, ऍड. प्रज्ञा उजागरे, ऍड. प्रज्ञा हेंद्रे, ऍड. पल्लवी पाटील, ऍड. राजेश कावरे, ऍड. शेलोत, ऍड. सागर पादीर, ऍड.अभय राजे, ऍड. अरुणा राशीनकर, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक एस.बी. बिडवे आदी उपस्थित होते.

महिला वकिलां करिता स्वतंत्र बार रूम नसल्याने अनेक महिला वकिलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात अहमदनगर बार असोसिएशनने न्यायालयाकडे महिला वकिलांकरीत स्वतंत्र वकील कक्ष मिळण्याची मागणी केली होती.

यावर उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयांना नुकतेच कौटुंबिक न्यायालयात काम करणार्‍या महिला वकीलांना स्वतंत्र वकील कक्ष मंजूर करण्यात आल्याचे पत्र दिलेले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा न्यायालयाने अहमदनगर बार असोसिएशनला सदरचे महिलांचे वकील कक्ष वापरण्यास परवानगी दिली आहे.

महिला वकिलांना कौटुंबिक न्यायालयात काम करताना स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने महिला वकीलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर बार असोसिएशनची महिला वकिलांकरिता स्वतंत्र वकील कक्षाची मागणी उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय यांनी पूर्ण केली आहे.

कौटुंबिक न्यायालयात काम करण्यास महिला वकिलांना वकील कक्षाचा चांगला लाभ होणार आहे. महिला वकील यांना स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने कौटुंबिक प्रकरणे हाताळताना या कक्षात बसून वाचन करून प्रकरणांची तयारी करणे अधिक सुलभ होणार असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष ऍड. भूषण बर्‍हाटे यांनी सांगितले.

कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश नेत्राजी कंक यांनी अहमदनगर बार असोसिएशनच्या उपस्थित महिला वर्गाला शुभेच्छा देऊन, स्वतंत्र वकील कक्ष मिळाल्याने यापुढे अधिक चांगले व सुलभ न्यायालयीन कामकाज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कोरोना नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वकील व पक्षकार उपस्थित होते.