कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आढळले म्युकरमायकोसिसचे 61 रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राज्यासह जिल्ह्यावर सुरु असलेला संकटाचा पाढा आद्यपही कायम आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला असून याचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे.

एकीकडे हे संकट कायम असताना नगरकरांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. हे संकट म्हणजे म्युकर मायकोसिस होय..

नुतकेच जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 61 म्युकर मायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर आले असून या सर्वांवर नगरमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मात्र या आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा जिल्ह्यात तुटवडा असल्याने इंजेक्शन शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत आणि औषधे महाग त्यात मृत्यूचे प्रमाण देखील जास्त असल्याने नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहे.

मधुमेह असलेल्या व कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत.

अशा रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनासमोर ठाकले आहे. अशा स्थितीत ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.