दरमहा 1100 रुपयांची गुंतवणूक करून तयार करा 20 लाखांचा निधी ! कसे? जाणून घ्या….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mutual Funds : चांगल्या भविष्यासाठी लोकं गुतंवणूकीवर जास्त भर देत आहेत. अशातच भविष्यात चांगला नफा मिळण्याच्या हेतूने बहुतेकजण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास निश्चितच बँकेपेक्षा जास्त फायदा मिळतो. पण या गुंतवणुकी तेवढ्याच जोखमीच्या आहेत. म्हणूनच जाणकारांचा सल्ला घेऊनच येथे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

भविष्यात जर तुम्हाला 20 लाख रुपयांचा निधी सहज तयार करायचा असेल, तर येथे तुम्हाला दरमहा केवळ 1100 रुपये गुंतवावे लागतील. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग म्हणजे एसआयपी. एसआयपी माध्यमात गुंतवणूक करणे म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडीमध्ये गुंतवणूक करण्यासारखे आहे. म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे. आणि भविष्यात जास्त नफामिळ्वणे

म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत 1100 रुपयांची एसआयपी सुरू केली, तर 20 लाख रुपयांचा निधी सहज तयार होईल. तथापि, तुम्हाला ही गुंतवणूक 25 वर्षे चालवावी लागेल. येथे असे गृहीत धरले जाते की म्युच्युअल फंड योजना दरवर्षी सरासरी 12% परतावा देईल. असे मानले जाते कारण म्युच्युअल फंड योजनांनी अधिक परतावा दिला आहे. तत्सम उत्कृष्ट शीर्ष 5 म्युच्युअल फंड योजना देखील येथे सांगितल्या जात आहेत.

5 वर्षांसाठी दरवर्षी सरासरी 20% पेक्षा जास्त परतावा देणार्‍या टॉप म्युच्युअल फंड योजना 

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 26.99 टक्के
क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना : 23.97 टक्के
Axis स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 22.95 टक्के
क्वांट अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना : 22.27 टक्के
क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड योजना: 21.85 टक्के

SIP म्हणजे काय ?

दर महिन्याला निश्चित तारखेला बँकेतून निश्चित गुंतवणूक आपोआप काढण्याच्या प्रक्रियेला SIP म्हणतात. ही एसआयपी कोणत्याही कालावधीसाठी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर एसआयपी कधीही बंद होऊ शकते. तसे केल्यास कोणताही दंड नाही. इतकंच नाही तर मधल्या काळात पैशांची गरज भासली तर गरजेनुसार पैसे काढता येतात. म्हणजेच, SIP तुम्हाला पूर्णपणे काहीही करण्याची परवानगी देते.