राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विश्वासघातकी -आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून, राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा आशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

कोव्हीडच्या कारणाने यापुर्वीच सलग पाचवेळा या परीक्षा राज्य सरकरने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता.आता झालेल्या निर्णयाप्रमाणे १४ मार्च रोजी या परीक्षा होतील या आशेने विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत होते.

परंतू सरकारने अचानक परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय करून विद्यार्थ्यासमोर अडचण निर्माण केल्याबद्दल विखे पाटील यांनी सरकारचा निर्णय हा अतिशय विश्वासघातकी असल्याचे सांगितले. या परीक्षेच्या तयारी करीता बहुतांशी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जावून राहात आहेत यासाठी त्यांना खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

सलग पाचवेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आता हवालदिल झाले आहेत.त्यातच या परीक्षेसाठी वयाची अट असल्याने परीक्षा जेवढ्या लांबणीवर गेल्यास वयोमर्यादेच्या अटीमुळे विद्यार्थांना भविष्यात या परीक्षेस बसणेही अडचणीचे ठरेल, याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे होते.

परंतू या सरकारकडे तशी संवेदनशीलता नसल्याने फक्त कोव्हीडचे कारण पुढे विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात घालण्याचे पाप राज्य सरकार करीत असल्याची टिका आ.विखे पाटील यांनी केली. केंद्र सरकारने कोव्हीडची सर्व नियमावली पाळून युपीएसीच्या परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या.

मग राज्य सरकार एवढे कोव्हीडचे नियम जनतेवर लादते तर, त्या नियमनानेच या परीक्षा सुध्दा १४ मार्च रोजी होवू शकल्या असत्या.नुकतीच आरोग्य विभागाची परीक्षा राज्य सरकारने घेतलीच तेव्हा कोव्हीड नव्हता का ॽ असा प्रश्न उपस्थित करून कोव्हीडच्या नावाखाली सरकार फक्त आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार न केल्यास केल्यास राज्यात विद्यार्थाचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशारा आ.विखे यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर