डेल्टा प्लसच महाराष्ट्रात तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल आणि…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राज्यात काेराेनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. राज्यासह मुंबईत रुग्णसंख्याही घटत असल्याचे समाेर येत आहे. याशिवाय काही दिवसांपासून राज्य सरकारने काेराेना निर्बंधही शिथिल केले आहेत. काही दिवसांवर गणेशाेत्सव येऊन ठेपला असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड हाेत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.

अशी स्थिती असताना, संभाव्य काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ डाॅक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. सद्यस्थिती पाहता, मे महिन्यापासून हळूहळू रुग्णसंख्या कमी हाेऊ लागली आणि जुलैच्या अखेरीस ४ हजाराच्या घरात गेली. पण गेले सव्वा महिना रुग्णसंख्या ४ ते ५ हजारांच्या घरात आहे. ही दुसरी लाट संपायला आणखीन महिना ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे.

यामुळे तिसरी लाट ऑक्टाेबरच्या मध्यावर सुरु हाेईल, अशी भीती तज्ज्ञ डाॅक्टर व्यक्त करत आहेत. – आधीची लाट ओसरत जाणे पण पूर्ण नाहीशी न हाेणे – आजमितीला महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी हाेत चालली आहे. पण कराेना बाधितांची संख्या राेज ४ ते ५ हजारांनी वाढतेच आहे.

त्यामुळे काही काळाने तिसरी लाट येणार हे नक्कीच – विषाणूंचा नवा प्रकार – राज्यात पहिल्या लाटेला मूळचा साेर्स-काेव्ही-२ हा विषाणू कारणीभूत हाेता. दुसऱ्या लाटेसाठी त्याचा नवा प्रकार बी.१.६१७.२’ म्हणजेच डेल्टा व्हेरियंट. हा डेल्टा जगात प्रथम महाराष्ट्रात अमरावतीमध्ये मिळाला आणि आता या डेल्टामध्येही म्युटेशन हाेऊन तयार झालेला डेल्टा प्लस.

एवाय.१,एवाय.२अािण एवाय.३ असे त्याचे तीन उपप्रकारही सापडले नुकत्याच झालेल्या नमुना चाचण्यांमध्ये हा विषाणू महाराष्ट्रासह १२ राज्यात सापडलाय आणि महाराष्ट्रातल्या १०.१२ जिल्ह्यात याच्या जून २०२१ पर्यंत ६५ केसेस सापडल्यात. हा डेल्टा प्लस आता कदाचित कमी प्रमाणात असेल, पण काही दिवसात त्याचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डेल्टा प्लसच महाराष्ट्रात तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल आणि लसींना दाद देत नसल्याने माेठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवसाला एक ते दीड लाखांपर्यंत रुग्णसंख्या वाढेल अशी चिन्ह दिसत असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टर सांगतात.

काेराेनाच्या नियमांची पालमल्ली ही हाेत असल्याचे मागील काही महिन्यांपासून वारंवार दिसून येत आहे, ही बाब ही तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल असेही वरिष्ठ डाॅक्टर सांगतात.