अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीत माणुसकीच्या भावनेने सर्व समाजाने योगदान दिले. शहरात लंगर सेवेने गोर-गरीब व वंचितांना आधार दिले. कोरोना काळात राजकारण बाजूला ठेऊन माणुसकीच्या भावनेने कार्य करण्यात आले. या संकटकाळात नगरकरांनी देखील मोठ्या संयमाने लढा दिल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

कोरोनाच्या संकटकाळात शहरात उत्तम पध्दतीने नियोजन करुन कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी व सर्वसामान्य कोरोना रुग्णांना आधार दिल्याबद्दल तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथे शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांच्या वतीने आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते.

याप्रसंगी जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, जस्पाल कुमार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अनिश आहुजा, जतीन आहुजा, कैलाश नवलानी, करणसिंग धुप्पड, बॉबी कंत्रोड, संजय आहुजा, जगमोहन व्होरा, राजू जग्गी,

विकास कंत्रोड आदी उपस्थित होते. जनक आहुजा म्हणाले की, अहमदनगर शहर संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संक्रमणात टॉपवर होते. कोरोनाची वाढती संख्या पाहता वैद्यकिय सुविधा देखील अपुर्‍या पुडू लागल्या होत्या. तर टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन मरणाचा प्रश्‍न बिकट बनला होता.

आमदार संग्राम जगताप यांनी गरजूंना जीवनावश्यक मदत पोहचविण्याचे कार्य केले. तसेच महापालिका आयुक्त व उपायुक्तांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्याने शहरात कोरोना संक्रमण अटोक्यात आले.

शासन व प्रशासन यांच्या योग्य नियोजनामुळे शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल शक्य होऊ शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आयुक्त शंकर गोरे यांनी कोरोना काळात शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले.