Dussehra 2023 : खरंच रावणाला 10 डोकी होती का?, जाणून घ्या त्यामागचे रहस्य आणि सत्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 Heads Of Ravana : हिंदू धर्मात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे, आज दसऱ्याला देशाच्या विविध भागात रावणाचे दहन केले जाईल, लोक रावणाचा पुतळा जाळतील. आजचा दिवस असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळून एकमेकांना शुभेच्छा देऊन लोकं दिवाळीची तयारी सुरु करतात, अशातच जेव्हा जेव्हा रावणाचे दहन केले तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे, खरंच रावणाला  10 डोकी होती का?

रावण हा लंकेचा राजा होता, त्याला लंकेश, लंकापती, दशग्रीव अशा अनेक नावांनी ओळखले जाते, तो अतिशय तेजस्वी होता, तो अतिशय पराक्रमी होता, अत्यंत जाणकार होता, वेदशास्त्रांचा जाणकार होता, एक महान पंडित आणि शिवाचा महान भक्त होता, रामायणातील महर्षी वाल्मिकी यांनी रावणाचे वर्णन केले आहे आणि रामचरित मानसमध्ये तुलसीदासजींनी सांगितले आहे की, त्याची प्रतिमा माणसाच्या डोळ्यासमोर राक्षसाच्या रूपात दिसते. वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसमध्ये रावणाचे वर्णन 10 डोके असल्याचे सांगितले आहे. आणि 20 हात असल्याचे सांगितले आहे. पण खरंच रावणाला दहा डोकी होती का?

आज आम्ही रावणाच्या 10 डोक्याचे रहस्य सांगणार आहोत, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की एखाद्याला 10 डोके असणे ही केवळ एक कल्पना आहे आणि ही देखील रावणाबद्दलची एक कल्पना आहे, आजची तरुण पिढी आणि जिज्ञासू लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात की रावणाची खरोखरच 10 डोकी होती का? त्याबद्दल वेगवेगळ्या समजुती, कथा आणि दंतकथा आहेत. काही लोकांच्या मते रावणाची 10 डोकी असल्याची कथा खोटी आहे, त्याला दहा डोकी नव्हती, त्याने फक्त 10 डोकी असल्याचा भ्रम निर्माण केला, काही लोक म्हणतात की रावण हा असा एकच व्यक्ती होता जो 6 शास्त्रे आणि 4 वेद देखील जाणत होते, म्हणून त्याला 10 मस्तकी होती, म्हणूनच त्याला दशानन, दशकंथी असेही म्हटले जाते.

पण हिंदू मान्यतेनुसार रावणाची दहा डोकी हे वाईटाचे प्रतीक मानले गेले आहेत, या दहा डोक्यांचे वेगवेगळे अर्थ आहेत, रावणाला दहा डोकी नसून त्याला दहा चेहरे होते असे म्हंटले जाते, त्या चेहऱ्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, घृणा, पक्षपात, अहंकार, व्यभिचार आणि धोखा अशी नावे देण्यात आली आहेत. आणि हे सर्व रावणात होते म्हणून त्याला असे नाव पडले, हे सर्व रावणाच्या 10 डोक्याचे अर्थ आहेत, काही धर्मग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की रावण 9 मण्यांच्या माळा घालत असे, तो या हारांना आपले मस्तक दाखवत असे आणि 10 मस्तकी असल्याचा भ्रम निर्माण करायचा, रावण मायावी असल्याने त्याला हे करणे खूप सोपे होते.

रावणाची 10 डोकी वाईटाचे प्रतीक

दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. कारण या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो. रावणाची 10 डोकी 10 वाईट गोष्टींचे प्रतीक आहेत ज्यापासून प्रत्येक व्यक्तीने दूर राहावे. रावण हे अहंकार, अनैतिकता, सत्ता आणि अधिकाराचा दुरुपयोग यांचे प्रतीक आहे. एवढेच नाही तर रावण हे देवापासून दूर जाण्याचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रावणाची दहा डोकी दहा वेगवेगळ्या वाईट गोष्टींचे प्रतीक आहेत.