महिन्याला 12000 रुपये गुंतवून कमवा लाखो रुपये; बघा पोस्ट ऑफिसची “ही” खास योजना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : जर तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. सध्या बाजारात भरपूर गुंतवणूक योजना आहेत ज्या तुम्हाला लवकर श्रीमंत बनवू शकता. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्यात खूप मदत करते.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात केलेली तुमची गुंतवणूक अगदी सुरक्षित राहते. विशेष बाब म्हणजे बाजारातील चढ-उताराचा याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. यावरील व्याजदर सरकार ठरवतात, ज्यांचा त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळत आहे. (वार्षिक)

कुठे खाते उघडू शकता?

तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते सहज उघडू शकता. खास गोष्ट म्हणजे हे खाते फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येते. यामध्ये तुम्हाला वर्षाला 1.50 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल. या खात्याची परिपक्वता 15 वर्षे आहे. परंतु परिपक्वतानंतर जर तुम्हाला पुन्हा हा कालावधी पुढे ढकलायचा असेल तर तुम्ही ते 5-5 वर्ष आणखी वाढवू शकता.

किती रक्कम जमा करता येईल?

तुम्ही पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास आणि ते 15 वर्षे कायम ठेवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल, तर 18.18 लाख रुपये तुमचे व्याज उत्पन्न असेल. ही गणना पुढील 15 वर्षांसाठी वार्षिक 7.1 टक्के व्याजदर गृहीत धरून करण्यात आली आहे.