अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- सर्जेपुरा येथील पेशवाई श्रीमंत यांच्या सहकार्याने महापद्मसेना नगर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त नगरमधील सर्व महिलांसाठी पेशवाई श्रीमंत ‘माहेरची साडी’ तसेच पुरुषांसाठी मिस्टर ‘पेशवाई श्रीमंत’ या फेसबुक प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रतियोगिताचा परितोषिक वितरण नुकतेच पेशवाई श्रीमंतचे संचालक राहूल येमूल, प्रशांत बल्लाळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजलीताई वल्लाकट्टी, आरोग्य सेविका डॉ. रत्नाताई बल्लाळ, शिक्षिका आशाताई दोमल, समाजसेविका श्रीमती विजया गुंडू, उद्योजक मनिष लोढा, गणेश चेन्नूर आदि उपस्थित होते.

या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे – महिला गट : (पेशवाई श्रीमंत-माहेरची साडी) प्रथम – अमृता सुरम-मुनगेल, द्वितीय – श्रेया दोमल-अंदे, तृतीय – वरलक्ष्मी आडेप. पुरुष गट : (मिस्टर पेशवाई श्रीमंत) प्रथम- आकाश अंदे, द्वितीय- अक्षय संभार, तृतीय – शशांक बोगा आदिंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी पेशवाई श्रीमंतचे संचालक राहुलदादा येमुल म्हणाले, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या वातावरणातून थोडा विरंगुळा, त्याचबरोबर बक्षिस जिंकण्याची संधी या स्पर्धेनिमित्त आम्ही उपलब्ध करुन दिली. फेसबुक फोटोफ्रेम लाइक्स प्रतियोगितेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेस नगरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

यापुढील काळातही महापद्मसेनेच्या सहकार्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी अंजलीताई वल्लाकट्टी म्हणाल्या, महिला व पुरुष हे आपले व्यक्तीमत्व नेहमीच चांगले असावे, याकडे काटाक्षाने लक्ष देत असतो.

सध्याच्या सण-समारंभाच्या काळात या व्यक्तीमत्वाला स्पर्धेच्या रुपाने आणखी आकर्षक करण्याचा पेशवाई श्रीमंत व महापद्मसेनाचा उपक्रम कौतुकास्पद असाचा आहे. डॉ.रत्नाताई बल्लाळ म्हणाल्या, कोरोनाच्या काळातील मन व शरीर प्रफुल्लीत ठेवण्यासाठी या स्पर्धेचा चांगला उपयोग झाला असल्याचे मिळालेल्या सहभागातून दिसून येते.

अशा स्पर्धांचे कायम आयोजन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महापद्मसेनेचे किरण वल्लाकट्टी, उदय सुरम, अमोल येनगंदूल, रवी दंडी, विनोद बोगा, अमित बिल्ला, विनीत बुरला विजय सब्बन, आनंद येनगंदूल, दिपक बुरला, प्रविण शिरापुरी, राजेंद्र इगे,

शंकर जिंदम, निलेश गंगुल, शुभम अंकाराम, संजय बोगा, संतोष मदनाल, लखन कोटा, प्रणव बोगा, शौनक बल्लाळ, प्रथमेश बोगा आदि उपस्थित होते. या उपक्रमासाठी महापद्मसेनेच्या सर्व पद्मसेवकांनी परिश्रम घेतले.