EPFO News : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओच्या वाढीव व्याजदराचा ‘या’ महिन्यापासून होणार लाभ, सोप्या पद्धतीने तपासा शिल्लक रक्कम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPFO News : केंद्र सरकारकने ईपीएफओ खातेधारकांना 24 जुलै रोजी ईपीएफओमधील व्याजदरात वाढ करण्यात आल्याची आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारकडून कमर्चारी भविष्य निधी योजनेच्या व्याजदरात 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे.

आता कर्मचाऱ्यांना लवकरच व्याजदर वाढीचा लाभ मिळणार आहे. पीएफ खात्यातील ठेवींवर आता 0.05% व्याजदर वाढल्याने 8.10% वरून 8.15% व्याजदर वाढला आहे. कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून पीएफ खात्यातील शिल्लक ठेव रकमेवर 8.15 टक्क्याने व्याजदर दिला जाणार आहे.

ईपीएफओ खातेधारकांना वाढीव व्याजदराचा फायदा ऑगस्ट महिन्यापासून दिला जाणार आहे. त्यामुळे देशातील ६.५ कोटी ईपीएफओ खातेधारकांना याचा फायदा होणार आहे. या खातेदारकांच्या खात्यात केंद्र सरकारकडून वाढीव व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

EPFO खात्यावर अधिक व्याज मिळेल

EPF खात्यावर ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर देण्याचे निश्चित केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या शिल्लक ठेव रकमेवर व्याजदर वाढवून द्यावा असा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना वाढीव व्याजदराने पैसे दिले जाणार आहेत.

आर्थिक वर्ष 2021-22 यासाठी EPFO कडून पीएफ कर्मचाऱ्यांना 8.10 टक्के व्याजदर जाहीर केला होता. मात्र कर्मचाऱ्यांना 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदराचा लाभ देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. कारण कर्मचाऱ्यांना 1977-78 मध्ये, EPFO ​​ने 8 टक्के व्याजदर दिला जात होता.

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये कर्मचाऱ्यांना पीएफमधील शिल्लक ठेव रकमेवर 8.65 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता. तसेच 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 8.55 टक्के व्याजदर, 2016-17 या आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याजदर आणि 2015-16 या आर्थिक वर्षासाठी 8.8 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता.

अशा प्रकारे EPFO ​​मध्ये पगारातून पीएफ कापला जातो

कर्मचाऱ्याचा पीएफ EPFO च्या नियमानुसार बेस पे आणि महागाई भत्त्याच्या 12% रक्कम खात्यात जमा केली जाते. तसेच कर्मचारी करत असलेली कंपनी देखील पीएफ खात्यात 12 टक्के रक्कम जमा करते. 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात आणि 8.33 टक्के रक्कम पेन्शन योजनेसाठी जमा केली जाते.

EPFO ची शिल्लक कशी तपासायची

जर तुम्हाला घरबसल्या पीएफची शिल्लक रक्कम तपासायची असेल तर तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या ई पासबुकच्या पर्यायावर जावे लागेल.
तुमच्यासमोर उघडलेल्या पेजवर तुम्हाला UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
शिल्लक रक्कम किंवा पासबुक पाहण्यासाठी तुम्हाला खातेदार आयडी पर्यायावर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पीएफ खात्याचे पासबुक उघडेल आणि सर्व माहिती तुम्हाला दिसेल.