अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाने देश ढवळून निघाला होता. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी, लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी केलेल्या उपोषणाची इतिहासात नोंद झाली.

काँग्रेस सरकारच्या काळात अण्णांनी हे आंदोलन केले होते. त्यानंतर, भाजपा सरकारच्या काळात अण्णा गप्प का? असा सवाल अनेकदा सोशल मीडियातून विचारण्यात येतो. त्यावर, आता अण्णांनी उत्तर दिलंय. मी एकटाच काय करू, असेही अण्णा म्हणाले.

देश बचाव जनआंदोलन समितीनं गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी, आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. अन्यथा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

त्यामुळं हजारे यांच्याकडून समितीला चर्चेला येण्याची निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. ‘जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत’ असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.

गेल्या काही काळापासून अण्णा हजारे हे शांत आहेत. दरम्यान देश बचाव जन आंदोलन या समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी देशातील विषयांवर अण्णा हजारांनी भूमिका मांडावी अशी मागणी केली होती.

त्यांनी भूमिका मांडली नाही तर आंदोलन करु असा इशारा देखील त्यांनी दिला होता. यानंतर अण्णा हजारे यांनी या समितीला चर्चेसाठी बोलावले होते. त्यांच्या भेटीदरम्यान अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी अण्णा हजारे यांनी देश बचाव जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आता माझे वय हे 84 वर्षे झाले आहे. देश बचाव जनआंदोलन समिती या तरुणांनी स्थापन केली आहे, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.

तुम्ही लढा उभारला तर मी त्यामध्ये नक्कीच सहभागी होईल असे आश्वासन देखील अण्णा हजारेंनी दिले. पुढे ते म्हणाले की, आपण यापूर्वी आंदोलने करुन लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करुन घेतले आहेत. मात्र आता सरकार बहुमताच्या जोरावर कोणतेही कायदे मंजूर करुन घेत आहे.

मागणी नसताना हे कायदे मंजूर केले जात आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. यामुळे सरकार काहीही करु शकत आहे. जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली तरच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील’ असे अण्णा हजारे म्हणाले.

हजारे म्हणाले, ‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कुठपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल.

आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत.

जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील,’ असेही हजारे म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली.