Financial Rules : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही नियम बदलत असतात. लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना सुरु होण्यापूर्वी लवकरात लवकर काही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला तुमच्याकडे असणारी 2,000 रुपयांची नोट बदलता येईल. 1 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा वैध राहणार नाहीत. ऑक्टोबर 2023 पासून कोणते नियम बदलत आहेत ते पाहुयात.
बचत खाते
तसेच अल्पबचत योजनेचे नियमही बदलले आहेत. सर्व लोकांनी त्यांच्या खात्यात आधार कार्डची माहिती टाकावी लागणार आहे. समजा कोणत्याही खातेदाराच्या खात्यात आधार माहिती नसल्यास त्याचे खाते १ ऑक्टोबर २०२३ रोजी गोठवण्यात येईल.
डिमॅट खात्यात नॉमिनी
सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी नामांकन बंधनकारक केले असून SEBI ने त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. जर कोणत्याही खातेदाराने त्याच्या खात्याच्या नामनिर्देशित व्यक्तीची माहिती दिली नाही तर त्याचे खाते १ ऑक्टोबरनंतर गोठवण्यात जाणार आहे.
सेबीने यापूर्वी नॉमिनीची माहिती देण्यासाठी ३१ मार्चची मुदत दिली असून त्यानंतर त्याची मुदत ६ महिन्यांसाठी वाढवली आहे. त्यामुळे लवकरात हे काम पूर्ण करावे.
म्युच्युअल फंड
हे लक्षात घ्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनाही नामांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 ठेवली आहे. समजा खातेदाराने ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्याचे खाते गोठवण्यात येऊ शकते. तसेच खाते गोठवल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाही.
TCS नियम
पुढचे महिन्यापासून TCS चे नियम बदलत असून अशा परिस्थितीत, जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी टूर पॅकेज खरेदी करत असल्यास तुम्हाला त्यावर TCS भरावे लागणार आहे. ७ लाख रुपयांच्या टूर पॅकेजवर तुम्हाला ५ टक्के टीसीएस भरावा लागू शकतो. इतकेच नाही तर, तुम्हाला 7 लाख रुपयांहुन अधिक किमतीच्या टूर पॅकेजवर 20 टक्के टीसीएस भरावा लागणार आहे.
2,000 रुपयांच्या नोटा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मे महिन्यामध्ये 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली होती. नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा जमा कराव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला ताबडतोब 2000 रुपयांची नोट बदलून किंवा जमा करावी लागेल.