Fixed Deposit : तुम्ही सध्या सुरक्षित आणि उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. सध्या बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेवींवरील परतावा जरी कमी असला तरी देखील येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान देशात अशा काही बँका अशा आहेत, ज्या मुदत ठेवींवर भरघोस व्याज देत आहेत.
मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. गुंतवणूकदारांना त्यावर ठराविक मुदतीसाठी निश्चित व्याज मिळते. याशिवाय, हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्यायही मानला जातो. याशिवाय पुन्हा-पुन्हा पैसे जमा करण्याचा त्रास नाही. बँका वारंवार व्याजदरात सुधारणा करत असतात. अशातच या आठवड्यात तीन बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. येस बँक, आरबीएल बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा या यादीत समावेश आहे. आज आपण याच बँकांचे एफडीवरील वाढीव दर जाणून घेणार आहोत. चला तर मग…
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरातही बदल केला आहे. बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 4.75% ते 7.25% व्याज देत आहे. तर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर 7% पेक्षा जास्त परतावा मिळतो. लक्षात घ्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज मिळतो.
येस बँक
येस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 3.25% ते 7.75% व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 3.75% ते 8.25% पर्यंत आहेत. बँक 18 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे, दर 7.75% आहेत. एका वर्षाच्या FD वर ७.२५% व्याज मिळते. बँक 60 महिन्यांच्या ठेवीवर 7.25% व्याज देत आहे.
आरबीएल बँक
RBL बँकेने FD व्याजदरात 50 bps ने वाढ केली आहे. हे 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50% ते 8% व्याज देत आहे. 546 दिवस ते 24 महिन्यांच्या ठेवींवर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५% अधिक परतावा मिळत आहे.