ताज्या बातम्या

Flipkart Sale : फ्लिपकार्टची अप्रतिम ऑफर! 108MP कॅमेरासह येणारा ‘हा’ फोन स्वस्तात खरेदी करता येणार, कसे ते पहा

Published by
Ahmednagarlive24 Office

Flipkart Sale : जर तुम्हाला स्वस्तात शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग्ज डे सेल तुमच्यासाठी आहे. परंतु तुम्हाला स्वस्तात फोन खरेदी करायचे असतील तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कारण या सेलची सुरुवात 4 मेपासून होणार आहे. सेल सुरु झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ घ्यायचा आहे. कारण ही सेल फक्त 10 मे पर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही 108MP कॅमेरा असणारा पोकोचा फोन फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

Poco X5 5G ऑफर

स्नॅपड्रॅगन 695 आणि फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले असणारा 15,000 किमतीअंतर्गत ऑफर करणारा हा कंपनीचा एकमेव फोन असून या फोनमध्ये डिस्प्ले 6.67 इंच दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा मिळू शकतो.

या फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो. हे लक्षात घ्या की लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 18,999 रुपये इतकी होती, मात्र या सेलमध्ये तुम्हाला 4,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन फक्त 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. इतकेच नाही तर या फोनवर आकर्षक बँक ऑफर्सही देण्यात येत आहेत.

Poco M5 ऑफर

Poco च्या या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Helio G99 प्रोसेसर मिळत आहे. सेलमध्ये या फोनची किंमत 12,499 रुपयांवरून 8,999 रुपयांवर ठेवण्यात आली आहे. कंपनी या फोनमध्ये 6.58 इंचाचा डिस्प्ले देत असून हा फुल एचडी + डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. कंपनीकडून यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Poco X5 Pro ऑफर

22,999 रुपये किंमतीचा हा प्रीमियम फोन 20,999 रुपयांच्या सेलमध्ये खरेदी करता येत आहे. कंपनीकडून या फोनमध्ये 6.67-इंचाचा Xfinity AMOLED डिस्प्ले देण्यात येत आहे. मजबूत ऑडिओ अनुभवासाठी तुम्हाला या फोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट मिळू शकतो. तसेच 108 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा असणारा कंपनीचा हा फोन स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरवर चालतो.

Poco C50 ऑफर

कंपनीचा हा फोन सेलमध्ये सवलत मिळाल्यानंतर 5,499 रुपयांना तुमचा असेल. या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio A22 चिपसेट देण्यात येत आहे. हा फोन 6.52 इंच HD+ डिस्प्ले सह येत असून यात तुम्हाला फोटोग्राफीसाठी 8-मेगापिक्सेल AI ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल.

Ahmednagarlive24 Office