अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  मतदार संघातील सर्व रस्ते उत्कृष्ट करण्याचा निर्धार आहे. कामांचा दर्जा चांगल्या ठेवण्यावर नेहमी भर आहे. स्थानिक नागरिकांनी कामाबाबत काही शंका असल्यास मला कधीही फोन करा.

केलेल्या विकास कामाच्या जीवावरच यापुढे मते मागणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राहुल जगताप यांनी केले. नगर तालुक्यातील गुणवडी-राळेगण रस्त्याचे भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. जगताप यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या कामासाठी ५६.५६ लक्ष निधी मंजूर केला. हा रस्ता १.१० किलोमीटर लांबीचा आहे.

यावेळी बाजार समिती सभापती अभिलाष पाटील घिगे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, दादा दरेकर, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, वाल्मिक नागवडे, सुधीर भापकर,

प्रशांत कुलांगे, संरपंच रंजना साळवे, रावसाहेब शेळके, माजी सरपंच महेंद्र शेळके, सुधाकर नागवडे, दत्तात्रय कुटे, मोहन कुटे, हर्षवर्धन शेळके, बाळू शेळके, बाळकृष्ण साळवे,

संतोष शेळके, रविराज शेळके, दिलीप शेळके, मच्छिंद्र उंडे, ज्ञानदेव शेळके, शरद शेळके, राजेंद्र गोरे, आबा शेळके, जगन्नाथ नाग़वडे, निखील भापकर, नितीन डूबल, पिंपळे भाऊसाहेब आदी उपस्थित होते.