माजी जलसंधारणमंत्री शिंदें म्हणाले जलयुक्त शिवार ही फडणवीस सरकारची …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जलयुक्त शिवार अभियानात अनियमीतता झाल्याबाबतच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अहवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचा निर्णय घेतला.

त्याबाबत माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे यानी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने त्रास देण्यासाठी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची बदनामी करण्यसाठी ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र कितीही चौकशी केली तरी ही योजना फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील चांगली योजना होती हेच सत्य समोर येत राहणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले की, या योजनेची चौकशी करत असल्याचे समजल्यानंतर मी दाव्याने सांगू शकतो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जलयुक्त शिवार सारखी खरी खुरी जनतेच्या भल्या योजना राबविण्यात आली.

शेतक-यांच्या पिण्याच्या पाण्यसाठी तसेच शेतीसाठी अतिरिक्त पाण्याचे साठे या योजनेतून निर्माण झाले. राज्यात टँकर्सची संख्या देखील या योजनेनंतर कमी झाले होते.

मात्र, महाविकास आघाडी सरकारने केवळ कुटील राजकीय हेतूने चौकशीत काही मिळाले नसल्याने दबावनिती आणि आकसबुद्धीच्या राजकारणासाठी ही चौकशी केली जात आहे. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही असे शिंदे म्हणाले.