जिओ फोन मिळणार पूर्णपणे मोफत, 2 वर्षांसाठी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- जिओ कडे त्याच्या वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेनुसार रिचार्ज योजना आहेत. कंपनीने JioPhone Offer 2021 अंतर्गत विशेषतः जिओ फोन ग्राहकांसाठी तीन रिचार्ज प्लान लाँच केले होते. 1,999, 1,499 आणि 749 रुपयांचे प्लान जिओफोन ग्राहकांसाठी आहेत.

आज आम्ही तुम्हाला जिओच्या 1,999 रुपयांच्या प्लानबद्दल सांगणार आहोत, जो एकदा रिचार्ज केल्यानंतर 2 वर्षांसाठी रिचार्ज करावा लागणार नाही. या सोबतच जिओ फोनही मोफत मिळणार आहे. फक्त जिओ फोन ग्राहक 1,999 रुपयांचा रिचार्ज प्लान रिचार्ज करू शकतात.

या प्लॅनची वैधता 1 वर्षे म्हणजे 365 दिवस आहे. या प्लानमध्ये कंपनी एकूण 48 जीबी हायस्पीड डेटा देते. प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल देखील दिले जातात. याशिवाय या प्लानमध्ये जिओ ॲप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत आहे.

या प्लानची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1,999 रुपयांच्या रिचार्जमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांव्यतिरिक्त, ग्राहकांना जिओ फोनही मोफत मिळतो. म्हणजेच, जर तुमच्याकडे फोन नसेल, तर तुम्ही हे रिचार्ज करून घेऊ शकता आणि तुम्हाला फोनद्वारे 2 वर्षांची मोफत सेवा मिळू शकते.

याशिवाय कंपनीकडे 1,499 रुपयांचा प्लान देखील आहे, ज्यामध्ये एकूण 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये 1 वर्षासाठी अमर्यादित व्हॉईस कॉल आणि जिओ ॲप्सची सुविधा आहे. जिओच्या या प्लॅनमध्येही कंपनी जिओ फोन मोफत देते. त्याचबरोबर 749 रुपयांच्या जिओफोन प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. प्लानची वैधता 1 वर्ष आहे.