Hyundai Alcazar : कारप्रेमींसाठी खुशखबर! Hyundai ने लॉन्च केली टर्बो पेट्रोल इंजिनसह 7-सीटर SUV, पहा फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Alcazar : Hyundai ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही कंपनी सतत नवनवीन कार लाँच करत असते. इतकेच नाही तर कंपनी आपल्या सर्व कारमध्ये शानदार फीचर्स देत असते.

अशातच आता कंपनीने आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा चांगली बातमी दिली आहे. कारण कंपनीकडून आता तीन-पंक्ती SUV Alcazar अपडेट करण्यात आली आहे. 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असणारी कंपनीची ही पहिली एसयूव्ही आहे. तसेच कंपनीने नवीन किमती जाहीर केल्या आहेत.

मिळत आहे Mahindra XUV700 पेक्षाही कमी पॉवरफुल इंजिन

याच्या टर्बो पेट्रोल इंजिनची XUV700 शी तुलना करायची झाली तर हे कळेल की XUV700 मध्ये मोठे इंजिन असल्यामुळे त्याची शक्ती खूपच कमी आहे. 2023 Hyundai Alcazar चे 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 158bhp आणि 253Nm जनरेट करत आहे.

इतकेच नाही तर यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड डीसीटीचा पर्याय देण्यात आला आहे. टर्बो पेट्रोल इंजिन शिवाय, ही कंपनी 1.5-लीटर डिझेल इंजिन देते, जे 113bhp आणि 250Nm जनरेट करते. तसेच या कारमध्ये 6-स्पीड एमटी आणि 6-स्पीड एटीचा पर्याय मिळत आहे. हे दोन्ही इंजिन RDE-अनुरूप आणि E-20 इंधन तयार आहेत.

या XUV700 ला दोन इंजिन पर्याय असून Alcazar चे इंजिन (पेट्रोल आणि डिझेल) दोन्हीपेक्षा कमी उर्जा निर्माण करतात. XUV700 चे 2-लिटर, टर्बो-पेट्रोल इंजिन 200PS आणि 380Nm जनरेट करते तर 2.2-लिटर डिझेल इंजिन 185PS आणि 450Nm जनरेट करते. दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.