दुध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; गाईच्या दुध दरानंतर आता म्हशीच्या दुध दरात ‘इतकी’ वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Money News :- शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय प्रतिकूल स्थितीत साथ देत असल्याचे सध्या चित्र आहे. मागील महिन्यात सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. आता  म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे.

या दर वाढी विषयी गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दूध उत्पन्नात घट झाली आसल्यामुळे एकट्या मुंबईत दिवसाकाठी 1 लाख 60 हजार वारणा दुधाचा खप होत होता.

यामध्ये 55 हजार लिटर दूध हे म्हशीचे तर उर्वरीत गायीचे असते. आता दूध संकलनात घट झाल्यामुळे परीणामी दूध दरही वाढले आहे.

31 मार्चपर्यंत म्हशीचे दूध 61 रुपये लिटर होते ते आता 1 एप्रिलपासून 64 रुपये लिटर झाले आहे. तीन रुपयांनी झालेली वाढ ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी आहे.

कारण दिवसेंदिवस पशूखाद्यांच्या दरातच वाढ होत होती. त्यात आता कापसा पासून सरकी बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पशुखाद्यात टंचाई भासत असल्याने त्याच्या दरातही वाढ झाली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जरी दुध दरात तीन रुपयांनी वाढ झाली असली तरी मात्र दूध घेणाऱ्या ग्राहकांना तीन रुपये आधीचे मोजावे लागणार आहेत.