खुशखबर ! जिल्हा परिषदेला मिळाल्या 45 अद्यावत रुग्णवाहिका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :-  अहमदनगर जिल्हा परिषदेने 11 कोटी 85 लाखांच्या निधीतून 45 अद्यावत रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला होता. या रुग्णवाहिकांचे सोमवारी हस्तांतरण करण्यात आले.

कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात आली. त्यानुसार जीवना परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकांचे हस्तांतरण करण्यात आले. करोना काळात या रुग्णवाहिकांचा मोठा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होणार आहे.

संपूर्ण जिल्हयाला होणार फायदा :-  नगर तालुक्यातील जेऊर, टाकळीकाझी, टाकळी खातगाव, देवगाव आणि वाळकी. नेवासा तालुका नेवासा खु, टोका, कुकाणा, सोनई. शेवगाव तालुका चापडगाव, शेवगाव, हातगाव. पाथर्डी तालुका माणिकदौंडी, मिरी, पिंपळगाव टप्पा.

जामखेड तालुका आरणगाव. कर्जत तालुका बारडगाव सुद्रिक, मिरजगाव. श्रीगोंदा तालुका पिंपळगाव पिसा, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी. पारनेर तालुका पळवे, कान्हूरपठार, खडकवाडी. राहुरी तालुका गुहा, मांजरी, टाकळीमियाँ, देवळाली प्रवरा,

उंबरे. श्रीरामपूर तालुका निमागावखैरी, माळवाडगाव, बेलापूर, संगमनेर तालुका निमगाव जाळी, घारगाव, धांदरफळ, जवळे कडलग, चंदनापुरी, जवळेबाभळेश्वर. अकोले तालुका विटा, कोतुळ, ब्राम्हणवाडा, खिरविरे. कोपरगाव तालुका दहिगाव बोलका, टाकळी ब्राम्हणगाव, पोहेगाव यांचा समावेश आहे.