Cheapest Smartphone : शानदार ऑफर! 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतोय ‘हा’ स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest Smartphone : मार्केटमध्ये सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. जर तुम्हाला स्वस्तात चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

कारण तुम्ही या सेलमधून Poco M4 Pro हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोकोने हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 17,999 रुपये इतकी आहे. परंतु, आता तो तुम्ही फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. काय आहे ही भन्नाट ऑफर जाणून घ्या.

फ्लिपकार्ट सेल दरम्यान, तुम्ही तुमचा जुना फोन बदलून नवीन स्मार्टफोन खरेदी करु करू शकता. इतकेच नाही तर स्वस्तात फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना भरपूर एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही जुना फोन एक्सचेंज कराआणि अगदी कमी किंमतीत उत्तम खरेदी करा.

जाणून घ्या Poco M4 Pro सवलत ऑफर

Poco M4 Pro हा स्मार्टफोन 17,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला, परंतु,जो आता Flipkart वर Rs 5000 च्या डिस्काउंटसह सूचीबद्ध आहे. तुम्ही हा फोन 17,999 रुपयांऐवजी फक्त 12,999 रुपयांना खरेदी करू शकता. स्टोरेजचा विचार केला तर यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध आहे.

अशी आहे एक्सचेंज ऑफर

Poco M4 Pro फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफरसह विक्री करण्यात येत आहे.या फोनसोबत 12,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही चांगल्या कंडिशनचा आणि लेटेस्ट मॉडेलचा फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला याचा पूर्ण फायदा मिळेल, त्यानंतर फोनची किंमत फक्त 599 रुपये इतकी असू शकते.

काय आहे बँक ऑफर

जर तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ घ्यायचा नसेल तर तुम्हाला बँके ऑफरचा लाभ घेता येईल. तुम्ही निवडक कार्ड्सद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. DBS बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% सूट तर IDBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% सूट आहे. Flipkart Axis Bank कार्डांवर 5% कॅशबॅक ऑफर करण्यात येत आहे.