अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका गट विकास अधिकारी सचिन घाडगे यांची पुणे ग्रामीणला उप मुख्यकार्यकारी अधिकारीपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे, संजय गेरंगे, इसळक सरपंच छाया गेरंगे, दहिगाव सरपंच मधुकर म्हस्के,

खडकी सरपंच प्रविण कोठुळे, दशमी गव्हाण सरपंच संगिता कांबळे, बुर्‍हाणनगर सरपंच रावसाहेब कर्डिले, बुरुडगाव सरपंच अर्चना कुलट, बापूसाहेब कुलट, भोयरे पठार सरपंच बाबा टकले आदी उपस्थित होते. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात काम करणार्‍या अधिकार्‍यांचा भविष्यकाळ उज्वल असतो.

राजकिय व सामाजिक दृष्ट्या जागृक जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. येथे काम करणारा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना काम करण्याची मोठी संधी आहे.

नगर तालुका गट विकास अधिकारी सचिन घाडगे यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांची उप मुख्यकार्यकारी अधिकारीपदी बढती झाली असून, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची ही पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे यांनी कोरोना काळात नगर तालुक्यात अधिकारी घाडगे यांनी चांगले योगदान देऊन कार्य केले. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळत असतात. सामाजिक जाणीव ठेऊन काम करणार्‍या अधिकार्‍यांना जनता विसरत नसल्याचे सांगितले.