अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे १४ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका दौऱ्यावर आहेत. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

१४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात डीपीडीसी निधीतून ऑक्सीजन प्लांट सुरू होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून हा प्लांट उभारण्यात आलेला आहे.

सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.