Hair Care Tips : नैसर्गिकरित्या काळे आणि दाट केसांसाठी घरच्या घरी करा हे उपाय, मिळतील जबरदस्त परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hair Care Tips : धावपळीच्या जीवनात कोणालाही शरीराकडे लक्ष देईल वेळ नाही. त्यामुळे कमी वयातच अनेकांना आजार जडतात. तसेच चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे शरीराचे आरोग्य (Health) चक्र बिघडून गेले आहे. कमी वयात आता केस पांढरे होण्याची (Hair graying) तसेच गळण्याची समस्या होऊ लागल्या आहेत.

प्रदूषण, ताणतणाव, हार्मोन्सचे असंतुलन, कोंडा, थायरॉईड, रासायनिक लोशनचा वापर आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता यामुळे केसांच्या समस्या (Hair problems) आजकाल सामान्य झाल्या आहेत.

केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक विविध प्रकारची बाजारातील उत्पादने वापरतात. बरेच लोक हेअर डाईचा (Hair dye) वापरही जास्त करतात. त्यामुळे केस कमकुवत होतात.

यासोबतच केसांचे नैसर्गिक सौंदर्यही नष्ट होते. जर तुम्हीही केसांच्या समस्येने त्रस्त असाल आणि नैसर्गिकरित्या काळे, दाट आणि लांब केस मिळवू इच्छित असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा. जाणून घेऊया-

कांदा बारीक करून पेस्ट बनवा. आता त्यात खोबरेल तेल किंवा लिंबाचा रस घालून केस धुवा. त्यानंतर सल्फेट फ्री शैम्पूने केस धुवा. असे केल्याने केस काळे आणि दाट होतात. तज्ज्ञांच्या मते तांदळाच्या पाण्याचा वापर करूनही केस काळे (Hair black), दाट आणि लांब होतात.

केसांची समस्या दूर करण्यासाठी देखील अंड्याचा मास्क वापरता येतो. यासाठी एका अंड्यामध्ये एलोवेरा जेल मिसळून हेअर मास्क तयार करा. आता केसांना मास्क लावा. कोरडे झाल्यावर शॅम्पूच्या मदतीने केस धुवा.

एरंडेल तेलाने केसांना मसाज केल्याने केस काळे, दाट आणि लांब होतात. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा केसांना कंघी करा. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात मूठभर मेथीचे दाणे भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट तयार करा.

आता ही पेस्ट केसांच्या टाळूवर लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस देखील कमकुवत होतात. यासाठी संतुलित आहार घ्या.