Happy Life Tips : सतत काम आणि चिडचिडीमुळे अस्वस्थ असाल तर हे कराच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- मन मारून उठणे आणि जीवावर आलं असतानाही काम करणे. सतत काम करत रहाणे, यामुळे होणारी चिडचिड यामुळे थकव्याला आमंत्रण मिळते. तर तुम्हाला स्वतःवर काही बंधने घालून घ्यायला हवीत.

काम तर चालू राहणारच. सतत काम करण्यामुळे केवळ शरीरच नाही, तर मनही थकते. दोन मिनिटं थांबा आणि विचार करा. तुम्ही यास समस्या मानता का? जर हो, तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. आता केवळ हे जाणून घेणं आवश्यक आहे की, ही समस्या कमी कशी करता येईल? यासाठी तुम्ही कुटुंबीयांची मदत घेऊ शकता.

घरातील ज्या कामांमध्ये इतरांची मदत घेणे शक्‍य आहे, त्यासाठी त्यांची मदत घ्या. त्यासाठी घरात मदतनीस ठेवू शकता. थोडेसे पैसे देऊन तणाव कमी करू शकता आणि आरोग्यही टिकवू शकता. सगळ्यात अवघड-सगळयात आधी :- दिवसाचं उत्तम नियोजन तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही लवकर उठाल. सकाळी मन फ्रेश असते, यामुळे कामं लवकर होतात. सगळ्यात आधी ते काम करा, जे अवघड आहे.

प्रत्येक काम रोज नको :- अशी काही कामं असू शकतात, जी तुम्ही आठवडाभराच्या यादीत घालू शकता. ती रोज करू नका. त्यांच्याविषयी विचारही करू नका. ऑफिसमध्येही अशी काम असतील ज्यांच्याविषयी रोज विचार करणे आवश्यक नाही. कामाची व्यवस्था आणि व्यवस्थापन उत्तम केले तर थकवा जाणवणार नाही.

स्वतःला विसरू नका :- हे काम महिला सहज करतात. आपल्या आरोग्यासाठी स्वत:साठी वेळ काढा, ताजं-पौष्टिक अन्न खाणं खूप आवश्यक आहे. आठवड्यातून एक-दोन तास स्वतःसाठी काढा. हा वेळ तुम्ही तुम्हाला हवा तसा व्यतीत करा, यामुळे तुम्हाला निश्‍चितपणे आनंद मिळेल. या दरप्यान मोबाइलला दूर ठेवा. व्हॉट्सअप आणि फेसबुक आनंदाचा आधार होऊ शकत नाहीत.