अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती.

मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. कोरोनमुळे आधीच बेरोजगारी वाढत असताना यातच शासनाकडून वारंवार परीक्षा रद्द करणे,

पुढे ढकलणे यातच अनेक विद्यार्थ्यांचे वय देखील निघून जात असल्याने या निर्णयावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती.

त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडूनदेण्यात आली आहे. कंत्राट दिलेल्या कंपनीनं गोंधळ टाळावा अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.