अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- दैनंदिन रुग्णवाढ नोंदवणाऱ्या महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली होती.

त्याबाबत आता राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याचे प्रमाण पहिल्यापेक्षा आता कमी आहे.

मात्र, केरळ राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता. केंद्र सरकारकडून कोरोनात खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच काही दिवसांसाठी संचारबंदीचा अवलंब करण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. त्यानुसार राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत तसेच केंद्र सरकारकडून देण्यात आलेलया सूचनाबाबत माहिती दिली. राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

सध्या केरळ मध्ये ओणम सणामुळे कोरोना चे प्रकरण वाढले आहे. केरळात सध्या केरळच्या मुख्यमंत्रानी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजे पर्यंत संचार बंदी लागू केली आहे.

रुग्णवाढीत केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे.या मुळे केंद्र सरकारची चिंता वाढत आहे. याला विचारात घेता केंद्र सरकार ने या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून रात्रीची संचारबंदी चा विचार करण्यास सांगितले होते.