file photo

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- घातक जंतू, विषाणू व मायक्रोब्जपासून आपल्याला वाचता येईल अशी व्यवस्था निसर्गाने आपल्या शरीरातच केली आहे. यालाच रोगप्रतिकारशक्ती वा इम्युनिटी म्हणतात. ज्याची इम्युनिटी मजबूत असते त्याच्या शरीरात रोगजंतू पोहोचूनही नुकसान करू शकत नाहीत.

पण ज्याची इम्युनिटी कमकुवत असते तो किरकोळ रोगजंतूंचे आक्रमण ही सहन करू शकत नाही. जेव्हा बाह्य रोगजंतूंच्या तुलनेत शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी पडते तेव्हा त्याचा परिणाम सर्दी, पडसे, फ्ल्यू, खोकला, ताप इ.च्या रूपात आपल्याला सर्वप्रथम दिसतो.

आयुर्वेदात एक प्रसिद्ध सिद्धांत आहे. रोगप्रतिकार क्षमता ओळखण्यासाठी ज्याला ‘क्षेत्र व बीजसिद्धांत’ म्हणतात. यानुसार रोगजंतूंना बीज मानले गेले आहे व शरीराचे क्षेत्र म्हणजे शेत. जेव्हा बियाणे अशा शेतात पेरले जाते जे सुपीक असेल तर तिथे तेच बियाणे उगवेल व आपले अस्तित्व प्रदर्शित करील, पण जर बियाणे नापीक जमिनीत पेरले गेले तर ते उगवणारच नाही. रोगजंतू व शरीराचेही असेच नाते आहे.

शरीर कडक नापीक असेल तर रोगजंतू त्यात उत्पन्नच होणार नाहीत. आणि शरीर कमकुवत म्हणजेच सुपीक असेल तर त्यात रोगजंतू वेगाने उत्पन्न होतील. आपण आपले शरीर शक्तिशाली बनवायला हवे. जेणेकरून त्यावर कोणतेही रोगजंतू आक्रमण करू शकणार नाहीत.

मादक पदार्थांपासून दूर रहा :- जे पुरेसे झोपत नाही करत त्यांच्या इम्युनिटी कमकुवत असते. ज्या व्यक्ती व्यायाम करीत नाहीत, वारंवार रोगपीडित होतात त्यांची इम्युनिटी कमकुवत असते. नशेपासून दूर राहा. तणाव टाळा. कमकुवत इम्युनिटी मुळे संक्रमणाची जोखीम वाढते. अशा लोकांना ऑटोइम्युन रोग होण्याचा धोका असतो.

इम्युनिटी कमकुवत :- वरचेवर आजाराच्या तावडीत सापडणे, सर्दी, पडसे, खोकला राहणे, घशात खवखव वा श्‍वासाला त्रास असा त्रास आपल्याला वारंवार होत असेल, तणाव, थकवा व सुस्ती इ. ही कमकुवत रोगप्रतिकारकक्षमते ची लक्षणे आहेत. जर जखम भरायला वेळ लागत असेल व काही खाल्ल्या-प्याल्यामुळे लवकरच इंफेक्शन होत असेल वा पोट खराब होत असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत मानावी.

इम्युनिटी वाढवण्याचे उपाय :- ० सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये भिजवलेल्या दोन लसणाच्या पाकळ्या एक दिवसाआड घ्या. सफरचंदाचे व्हिनेगर व लसूण दोन्ही इम्युनो मॉड्युलेटर असतात. ० हळद अर्धा चमचा व त्यात मध मिसळून रोज रात्री झोपताना दुधातून घ्या. ० आवळा अर्धा चमचा घ्या. त्यात मध मिसळून रोज सकाळी घ्या.

आवळा व्हिटॅमिन सी चा स्रोत आहे. ० अन्न शिजवताना हळद, जिरे, धणे, लसूण, दालचिनी, तमलापत्र, मेथ्या, लवंग, काळी मिरी, आले, साधे व मसाल्याचे वेलदोडे इ.चा वापर करायला हवा. ० उन्हापेक्षा उत्तम इम्युनिटी बृस्टर इतर कोणतीही नाही. रोज किमान ३0 मिनिटे उन्हात बसावे.

० आचार रसायन आयुर्वेदात वर्णित एक विशेष प्रकारचे रसायन आहे. उत्तम आचरण, व्यवहार, विचारही रसायन औषधांसारखे (वृद्धल्वनाशक व रोगप्रतिकारक्षमतावर्धक) काम करतात. ० ध्यान, प्रार्थना करा. जेव्हा मन शांत व॒ भयमुक्त असते तेव्हा शरीराची प्रतिकारक्षमता खूप वाढते. ० जंक फूड, दूषित पाणी व अन्न टाळा.