जमिनीच्या वादातून पुढे आले अहमदनगर जिल्ह्यातील हनी ट्रॅप प्रकरण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-  नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनी ट्रॅप प्रकरणांत तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल

गुन्ह्यामध्ये संबंधित महिला व एका आरोपीला वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर आरोपींना या गुन्ह्यामध्ये वर्ग केले जाणार आहे.

तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी ! :- नगर तालुक्यातील जखणगाव येथे पंधरा दिवसांपूर्वी हनीट्रॅपचे प्रकरण उघडकीस आले होते. एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ काढण्यात आला होता व संबंधित व्यक्तीला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी येथील नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

हनी ट्रॅप प्रकरण हे जमिनीच्या वादातून.. :- दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक सानप यांच्याशी संपर्क साधला असता हनी ट्रॅप प्रकरण हे जमिनीच्या वादातून पुढे आले असल्याचे तपासामध्ये प्राथमिक दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे.

दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये सात दिवसाने वर्ग… :- दरम्यान आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये सात दिवसाने वर्ग केले जाईल. कारण सात दिवसांचे क्वारंटाईन संपल्यानंतर त्यांना या गुन्ह्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर वर्ग केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

शासकीय अधिकाऱ्याला खंडणी मागितली होती ! :- संबंधित महिला व नगर येथील कायनेटीक चौकामध्ये राहणारा अमोल मोरे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यांना सुरुवातीला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. याच तपासादरम्यान त्या दोघांविरुद्ध याच पोलिस ठाण्यामध्ये अशाच प्रकारे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला होता. एका शासकीय प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्याला खंडणी मागितल्यचे प्रकरण समोर आले आहे.

आरोपींना वर्ग करण्यासाठी परवानगी मागितली . ;- सदर दोन्ही गुन्ह्यामध्ये हेच आरोपी असून तपासामध्ये अन्य चार जणांची नावे निष्पन्न झाली होती. यामध्ये सुनील खेसे व बापू सोनवणे यांचाही यामध्ये समावेश होता. त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती.

तर पहिल्या प्रकरणांमध्ये संबंधित महिला व अमोल मोरे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना आता तीन कोटी रुपयांच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग केले जाणार आहे. काल नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी न्यायालयामध्ये या आरोपींना वर्ग करण्यासाठी परवानगी  मागितली आहे.