Pikvima Server Down : ‘१ रुपयात पीकविमा´ कसा घेणार ! फॉर्म भरण्याचा सर्व्हर डाउन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pikvima Server Down : शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असताना तीन दिवसांपासून फॉर्म भरण्याचा सर्व्हर डाउन झाल्याने नोंदणी रखडली आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी या योजनेत मोठया प्रमाणात सहभाग घेतल्याचे चित्र आहे. एका रुपयात पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा म्हणून कृषी विभाग प्रयत्न शील आहे. पीकविमा नोंदणी ऑनलाइन असल्याने शेतकऱ्यांना त्यासाठी थोड्याफार प्रमाणात पैसे मोजावे लागतात.

नोंदणी करताना कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागतो. यामुळे खासगी ऑनलाईइनकडे बोट दाखवले जाते. एवढे करूनही शेतकरी आता सीएससी केंद्र किंवा खासगी केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी तयार झाल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास तांत्रिक अडसर निर्माण झाला आहे. संबंधित शेतकऱ्याचे आधारकार्ड ‘व्हेरीफाय’ होत नाही, तर कधी सातबाऱ्याची वेबसाइट बंद असते. भूमी अभिलेखाच्या वेबसाइटवर अचानकपणे जास्त भार आल्यामुळे ही वेबसाइट बंद पडत असल्याचे सांगितले जात आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची वेबसाइट जेव्हा आधार किंवा सातबाऱ्यासोबत पडताळणी करण्याची वेळ येते तेव्हाच वेबसाइट बंद पडते. दिवसभरात साधारणतः पाच ते दहा मिनिटे ही वेबसाइट सुरू राहात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांची इच्छा असतानादेखील या योजनेत त्यांना सहभाग घेता येत नसल्याने त्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.