मुंबई : राज्यात जसे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आले आहे तेव्हापासून आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणानेच (Central Investigation Agency) ससेमिरा चालूच आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागील शनी काही हटताना दिसत नाही. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास अघाईच्या नेत्यांमागे कंबरच कसून लागलेले दिसत आहेत.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु आहे. अशातच शिवसेना (Shivsena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तसं समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी परबांना जावंच लागणार आहे.
चौकशीसाठी बोलावलं तर परबांना भीती वाटतेय. गेल्यानंतर काय होणार, हे अनिल देशमुखांनाच विचारा असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे. परबांना भीती वाटत असली तरीही ईडीचा बुलावा आला असेल तर जावंच लागणार आहे असेही सोमय्या म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या राहुल गांधींवर आरोप करताना म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे २४ महिन्यात लुटण्याचं काम करतायत. काँग्रेसने ७० वर्ष हे काम केलंय. काँग्रेसचा एकही नेता हे का नाही सांगत की मीडियाच्या नावानं घेतलेला प्लॉट फक्त ५० लाखात राहुल गांधी, सोनिया गांधींच्या कंपनीला दिला.
ज्याचं बाजारमूल्य आज ४०० कोटी रुपयेहून अधिक आहे. हजार कोटी रुपयेही होऊ शकतं. जनतेची जमीन ५० लाखात घ्यायची आणि आपल्या कंपनीत ट्रान्सफर करायची, याचं उत्तर द्यावंच लागणार असेही सोमय्या म्हणाले आहेत.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे सत्तेवर आलेल्यानंतर त्यांनी तोडफोड शब्द बदलला. राज्यसबेच्या वेळी संजय राऊतांनी सहा आमदारांना धमक्या दिल्या. राज्याचं नाक कापून घेतलं.
पण विधानपरिषदेत कपडे उतरवले जाऊ नये म्हणून धमकी देत होते. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी अशा धमक्या दिल्या तर आम्ही माफ करणार नाही. कोर्टाकडेही जाणार आणि माफियांचं राजकारण बंद करणार.