अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- इम्युनिटी आपल्याला आजारांपासून वाचवते. जर इम्युनिटी कमकुवत पडली, तर शरीरही याचे संकेत देते. ते संकेत कोणते ते पहू.

दीर्घकाळ तणाव :- दीर्घकाळपर्यंत तणाव राहिल्यामुळे इम्यून सिस्टीमचा रिस्पॉन्स खूप कमकुवत होतो. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननुसार तणाव शरीरात लिम्फोसाइट म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण कमी करतो. याच पेशी संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.

सतत सर्दी – पडसे होणे :- हिवाळ्यात दोन-तीन वेळा सर्दी-पडसे होणे सामान्य आहे. बहुतेक लोक ७ ते १0 दिवसांत बरे होतात. रोगप्रतिकार प्रणालीला अँटीबॉडी बनवण्यास तीन ते चार दिवसांचा काळ लागतो, पण जर जास्त काळ आपल्याला पडसे राहात असाल, तर हे कमकुवत इम्युनिटीचे लक्षण आहे.

वरचेवर कानाने इन्फेक्शन :- अमेरिकन अकॅडमी ऑफ एलर्जी अस्थमा अँड इम्युनोलॉजीनुसार एक वर्षात चारपेक्षा जास्त वेळा कानाचे इन्फेक्शन होणे, एका वर्षात दोनदा न्यूमोनिया होणे कमकुवत इम्यून सिस्टीमकडे बोट दाखवते अशी लक्षणे दुर्लक्षू नयेत.

पोट नीट न राहणे :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार ७0% इम्युनिटी पचमतंत्रावव अवलंबून असते. येथे लाभदायक बॅक्टेरिया व सूक्ष्मजीव आतड्याला संक्रमणापासून वाचवत असतात. जर आपल्याला नेहमी डायरिया, बद्धकोष्ठता ची तक्रार असेल, तर हे कमकुवत इम्युनिटीचे लक्षण असू शकते.

शरीराच्या जखमा उशिरा भरणे :- कोठेही कापले, भाजले वा खरचटल्यास त्वचा वेगाने डॅमेज कंट्रोल मोडवर येते. शरीर नवी त्वचा बनवण्यास मदत करण्यासाठी त्या जागी पौष्टिक घटकांनी युक्त रक्त पाठवून जखमेचे रक्षण करणे सुरू करते. ही प्रोसेस सुदृढ इम्यून सेल्सवर अवलंबून असते.