अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषदेच्या कामामध्ये टक्के वारी वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे जास्त दिवस टिकणार नाही .

जिल्हा परिषदेमधील कामाची टक्केवारी कायमची बंद करायची असेल भाजप सरकारच्या हातात सत्ता दया. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. नगर तालुक्यातील आगडगाव, येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

या वेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रमुख उपस्थित होते. लसीकरण सेंटरवर फक्त फोटो काढणे, ते सोशल मीडियावर प्रसिद्धिमाध्यमातून फ्लॅश करणे, एवढाच आज काहींचा उद्योग सुरू आहे. केंद्र सरकार मात्र कोविडवर शिस्तबद्ध काम करीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दिवसाला २० लाख लोकांचे लसीकरण करीत आहे. एखाद्या देशाची लोकसंख्याही २० लाख नाही, तेवढे लसीकरण आपण एका दिवसात करतो आहोत. यापुढील काळात गावातील वॉर्ड तेथे लसीकरण उपक्रम प्रत्येक गावात राबवण्यात येईल.

कोविड सेंटरवर फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या काही नेत्यांचा त्यांनी खरमरीत शब्दांत समाचार घेतला. विखे पाटील म्हणाले, की तालुक्यातील प्रत्येक रस्ता, बाह्यवळण रस्ता, सूरत महामार्ग आणि इतर महामार्गाने जोडला जात असल्याने तालुक्यातील युवकांना शेतकऱ्यांना चांगले दिवस असतील.

ज्या गावातून महामार्ग गेलेल्या इतर गावांची प्रगती आपण पाहत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या विकासाबरोबरच सामान्य नागरिकांचा विकास होणार आहे.