Success Life Tips: आयुष्यात यशस्वी होयचं असेल तर आवश्यक आहे वेळेचे व्यवस्थापन, जीवनात आजच लावा या 3 सवयी…….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Life Tips: आयुष्यात यशस्वी (success in life) व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही. यामागचे एक कारण म्हणजे वेळेचे व्यवस्थापन (time management). अनेकांना आयुष्यात खूप काही करायचे असते पण वेळेअभावी ते ते करू शकत नाहीत. मात्र, पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक आहे. पण काहीतरी नवीन शिकायला वेळ लागतो. त्यामुळे पुढे जाण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन शिकणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया वेळेचे व्यवस्थापन कसे करावे…

आपल्या प्रत्येक कार्यासाठी रिमाइंडर सेट करा –

आपण जीवनात इतके व्यस्त असतो की कधीकधी आपण महत्त्वाच्या गोष्टी करणे विसरतो. विसरण्याच्या या सवयीमुळे आपल्यावर कामाचा ताण वाढतो. यानंतर, जेव्हा आपण सर्व काम एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला बराच वेळ वाया जातो. म्हणूनच तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही रिमाइंडर सेट करणे (setting reminders) महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल, तेव्हा इतर गोष्टींसाठी वेळ शिल्लक राहील.

डेली प्लॅन बनवा –

वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी तुम्ही डेली प्लॅन (Daily Plan) बनवून काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे जीवनाचा समतोल राखला जातो. जेव्हा तुम्ही दैनंदिन योजनेनुसार काम करता तेव्हा तुम्हाला दिसून येईल की दिवसाच्या शेवटी तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल. डेली प्लॅन बनवल्यानंतर तुम्ही त्याचे नियमानुसार पालन करणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येक काम निश्चित मुदतीत पूर्ण करा –

आपल्या सवयींपैकी एक सवय जी आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनापासून दूर ठेवते ती म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय (Procrastination). अनेक वेळा आपल्याला असे वाटते की कोणतेही काम कमी वेळेत पूर्ण होऊ शकते परंतु आपण तसे करणे टाळले पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामासाठी डेडलाईन (deadline) ठरवून त्या वेळेत काम पूर्ण केले पाहिजे.

जर तुम्ही या तीन सवयी जीवनात अंगिकारल्या तर लवकरच तुम्ही वेळेचे व्यवस्थापन शिकाल आणि यशाच्या एक पाऊल जवळ पोहोचाल.