अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- लग्न ठरल्यानंतर लग्नाची तयारी तर तुम्ही करता मात्र लग्नाआधी तुम्ही तुमच्या मेडिकल टेस्ट केल्यात का? नसेल तर लगेच करून घ्या. कारण पत्रिका आणि मनं जुळणं जितकं गरजेचं आहे, तितकंच मेडिकल टेस्टही.

ज्यामुळे लग्नानंतर तुमच्या संसारात कोणत्या समस्या येणार नाहीत. लग्नाआधीच आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जाणून घ्या. कारण आनंदी व समाधानी लैंगिक आयुष्यासाठी तयारी करणंही तितकंच आवश्यक असतं.

महिलांप्रमाणाचे पुरूष देखील बहुतांश वेळा लैंगिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे लग्नानंतरच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. यासाठी काही टेस्ट आवश्यक कराव्यात.

Advertisement

इनफर्टिलिटी टेस्ट :- आपली प्रजनन क्षमता समजून घेण्यासाठी ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे. इन्फर्टिलिटी टेस्टचे तशी काही स्पष्ट लक्षणं नाहीत. मात्र जर तुम्ही लग्नाआधीच ही टेस्ट केली आणि तुम्हाला लग्नानंतर लगेच मूल हवं असेल, तर त्यादृष्टीने उपचार करता येतात. मूल होत नाही यासाठी एकमेकांना दोष दिल्यानं नातं तुटू शकतं.

जेनेटिक टेस्ट ;- लैंगिक समस्या या आनुवांशिक देखील असू शकतात. याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी लग्ना आधीच जेनेटिक टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला फक्त रोगासंबंधितच माहिती मिळणार नाही तर तुम्ही आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या इतिहासाबद्दलही (health history) माहिती जाणून घेऊ शकता. या टेस्टमुळे तुम्ही स्वत:चाही एखाद्या आजारापासून बचाव करू शकता, शिवाय तुमच्या मुलाला याचा कोणताही त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊ शकता.

एड्स :- एड्स हा एक जीवघेणा आजार असून एखाद्या महामारीपेक्षा कमी नाही. एड्सची लागण संक्रमण सुई आणि त्याव्यतिरिक्त अनैतिक लैंगिक संबंध प्रस्तापित केल्यामुळे होते. शिवाय आईला एड्स झाला असल्यास तो गर्भातील बाळालाही होतो. एड्स खरं तर कोणता खास आजार नसून फक्त एक लक्षण आहे. जे लक्षण शरीराला इतकं खंगवत नेतं की शरीर इतर रोगांशी लढा देण्यालायक राहत नाही. म्हणूनच हेल्दी सेक्स लाइफसाठी लग्नाआधी मुला-मुलींनी आपली एचआयव्ही टेस्ट करून घेणं अत्यंत आवश्यक असतं.

Advertisement

एसटीडी टेस्ट :- सध्याच्या घडीला लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवणं अनेकांसाठी सामान्य झालं आहे. त्यामुळे लैंगिक संक्रमित आजारांची चाचणी करणं गरजेचं आहे. यामध्ये एचआयव्ही, स्किन इन्फेक्शन, हेपेटायटिस अशा आजारांचा समावेश आहे. यापैकी काही आजार धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे लग्नाआधी एसटीडी म्हणजेच सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजची चाचणी जरूर करून घ्या.