विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी तक्षिला स्कूलचा वर्चुअल रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी तक्षीला स्कूलच्या वतीने वर्चुअल पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती कार्यक्रमातंर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. विविध 23 प्रकारच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग लाभला.

देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, शहीद जवान व कोरोनायोध्दांना सलाम करुन या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी तक्षिला स्कूलच्या वतीने रंग दे बसंती आंतर शालेय स्पर्धा घेण्यात येते. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेतली जात आहे. या स्पर्धेचा शुभारंभ स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे, शाळेचे समन्वयक तन्वीर खान, नीरज व्होरा, ओंकार सिंग, कोमल वीजन,

वासंती तिरमल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑलनलाईन पध्दतीने करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य व गीत सादर केले. रंग दे बसंती आंतरशालेय स्पर्धेत फॅशन शो, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, मोनो अ‍ॅक्ट, कथाकथन, अ‍ॅड मॅड शो, फ्लॉवर डेकोरेशन, बेस्ट ऑफ वेस्ट, स्टँड अप कॉमेडी, कुकिंग फ्रुट कार्व्हिंग, वाद-विवाद, रेडिओ जॉकी, गायन, ग्रीटिंग कार्ड बनवा,

पूजा थाळी सजावट आदी 23 प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये प्री-प्रायमरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या 342 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. प्राचार्या जयश्री मेहेत्रे म्हणाल्या की, देशभक्त व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देश स्वातंत्र्य केले.

तर सिमेवर असलेल्या जवानांमुळे तसेच कोरोनायोध्दांमुळे सध्या आपण सुखी जीवन जगत आहोत. या महान विभूतींच्या स्मृतीपासून प्रेरणा घेऊन देशभक्तीची भावना सर्वांनी जागृक ठेवली पाहिजे. कर्तव्याचे पालन करुन एक चांगला नागरिक बनण्याचे सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

देश सशक्त व विकसित करण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण त्या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींनी केले. पंचांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे योगदान लाभले.