तिसऱ्या लाटेत एवढे लाख लोकांना कोरोनाची बाधा होईल; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- देशात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या दोन लाटांचा सामना देशाने केला आहे. यामध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाली तसेच अनेकांचा यामध्ये बळी देखील गेला आहे.

तसेच कोरोनाची सर्वाधिक वाढ हि महाराष्ट्रात आढळून आली आहे. दरम्यान तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून आता यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

26 ऑगस्ट रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले होते. आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होतील असा अंदाज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. कोरोनाचा कोणताच मृत्यू लपवला नाही हे ठामपणे सांगतो, असं टोपे म्हणाले. तसंच केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

केरळमध्ये ओनम हा सण साजरा झाला. तिथे गर्दी झाली होती. त्यामुळे एकाच दिवसात मोठी रुग्णसंख्या वाढली. मी स्वत: केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी फोन करुन बोललो. 31 हजार केसेस एकाच दिवसात आल्या. तिसऱ्या लाटेची सुरुवात केरळमधून झाली असं समजायचं का? त्यावर त्यांनी दोन कारणं सांगितली, असं टोपे म्हणाले.