कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास जिल्ह्याचे निष्क्रीय पालकमंत्रीच जबाबदार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जागतिक महामारीच्या विळख्यातून अनेक राज्यांची मुक्तता होत असतांना अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यास जिल्ह्याचे निष्क्रीय पालकमंत्रीच जबाबदार असून,

कोल्हापुरहून अहमदनगर येथे 20-25 दिवसांतून एकदा येऊन फक्त आढावा बैठका घेऊन उंटावरुन बसून शेळ्या हाकण्याचे काम हे पालकमंत्री करीत असून,

प्रशासनाकडून अपुरी माहिती घेऊन फक्त कोरोनाची काळजी घेत असल्याचा दिखावा करुन प्रसिद्धी मिळवित आहेत, असे आरोप भाजपा अल्पसंख्यांक आघाडी शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

जिल्ह्यात कोरोबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे अहमदनगर जिल्हा हा अजूनही लॉकडाऊनच्या विळख्यात अडकला आहे.

वास्तविक पाहता पुण्यासारख्या शहरात कोरोनाचा प्रभाव वाढलेला होता, परंतु तेथेही लॉकडाऊनचे कडक निर्बंध शिथिल होऊ शकतात तर नगर सारख्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल का होऊ शकत नाही? अहमदनगर जिल्ह्यातून लॉकडाऊन त्वरित काढण्याची गरज आहे.

सर्वसामान्य, गोरगरीब, हातावर पोट असलेल्यांपासून व्यापारी, दुकानदार या लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आले असून, नागरिकांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.

या करीता सर्वांना दरमहा रोख पैसे देऊन त्यांचे प्रपंच वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी औषधोपचार व कोरोना नियंत्रणात करुन कोरोना काळात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात तळ ठोकून बसणे आवश्यक होते.

ही जबाबदारी पूर्ण करु न शकणार्‍या पालकमंत्र्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे हाजी अन्वर खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.