पाणी अधिक म्हणुन उसाच्या क्षेत्रात वाढ पण…..! अतिरिक्त उसावर शरद पवार यांनी सांगितला रामबाण तोडगा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra news :-अलीकडे राज्यात सर्वत्र उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात येतं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण योजना (Water conservation plan) राबविल्या जात असल्याने पाण्याची आधीसारखी आता टंचाई (Water Shortage) भासत नाही यामुळे पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) मोठ्या प्रमाणात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

उसाच्या क्षेत्रात (Sugarcane Cultivation) वाढ झाली असल्याने उत्पादनात देखील मोठी वाढ झाली आहे आणि यामुळे अजूनही उसाचा गाळप हंगाम (Sugarcane crushing season) सुरूच आहे.

अजूनही अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane Producer) उस फडातच उभे आहेत. उसाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे साखर कारखान्यांवर अतिरिक्त ताण बघायला मिळत आहे. अजूनही अतिरिक्त ऊस फडात उभा असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

अतिरिक्त ऊस गाळपावरून राज्यात अगदी बांधा पासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार (Former Agriculture Minister Sharad Pawar) यांनी देखील या बाबत एक मोठे वक्तव्ये दिले आहे.

शरद पवार यांनी सांगितले की, पाण्याची व्यवस्थित सोय झाल्यापासून आपण पाणी दिसलं की, उस लावतो यावर आता विचार करणं महत्त्वाच आहे. शरद पवार सांगली च्या दौऱ्यावर असताना अतिरिक्त ऊसाबाबत आपले मत मांडले.

पवार यांनी सांगितले की ब्राझील, अमेरिका सारख्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा वापर केला जातो. यामुळे उसापासून साखर उत्पादित करण्याच्या पलीकडे विचार करावा लागेल असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी यावेळी मांडले. एवढेच नाही शरद पवार यांनी उसाची लागवड वाढत असल्याने चिंता देखील व्यक्त केली आहे. मे अखेर पर्यंत हंगाम हंगाम सुरू राहणार असे चित्र या वेळी बघायला मिळत आहे.

शरद पवार यांनी सांगितले की उसापासून फक्त साखर निर्माण करायची असा विचार करून चालणार नाही उसापासून दुसरे उत्पादन तयार करण्यासाठी विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अतिरिक्त ऊस लागवडीमुळे कारखान्यांवर मोठा ताण येत आहे.

त्यामुळे गाळप कसे करायचे हा देखील मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अतिरिक्त उसाबाबत शरद पवार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) यांच्याकडून अद्यायावत माहिती जाणून घेणार आहेत.

शरद पवार यांच्या मते, पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने वावर दिसलं की शेतकरी बांधव उसाची कांडी लावतो. पण फक्त साखर एके साखर असं करून चालणार नाही. दुसरा काहीतरी पर्याय शेतकरी बांधवांसाठी शोधावा लागणार आहे असे यावेळी पवार यांनी नमूद केले.