शहरात आजारांचा वाढता प्रादुर्भाव; उपाययोजनांची आवश्यकता भासतेय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने कहर केला आहे. यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अगदी महत्वाचा झाला आहे. यातच नगर शहरात विषाणूजन्य आजरांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

यामुळे नगर शहरासह उपनगरांत औषध फवारणीसह अन्य उपाययोजना सुरू कराव्यात, अशा सूचना आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. शहरासह उपनगरांत डेंग्यूचे २२ संशयित रुग्ण आढळून आले होते.

यापैकी ५ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे तपासणीतून समोर आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. विषाणूजन्य अजाराचे रुग्ण वाढत असल्याने शहरासह उपनगरांत औषध फवारणी करण्याच्या सूचना सदस्यांनी केल्या.

दरम्यान महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या जुन्या इमारतीत बैठक झाली.

बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, समितीचे सदस्य सचिन जाधव, निखिल वारे आदी उपस्थित होते. यावेळी या विषयावर चर्चा झाली.

नागरिकांनो या गोष्टींची काळजी घ्या…

  • डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे.
  • कुंड्यांमधील पाणी काढून टाकणे, साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावेत.
  • पाणी दररोज उकळून प्यावे,