जखमी हरिणाला वन्यजीव प्रेमीकडून जीवदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील कोळ्याची वाडी येथे मेंढपाळाला जखमी हरीण आढळून आले या हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्याला वन्यजीव प्रेमी श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून वन विभागाच्या ताब्यात दिले.

मंगळवारी दुपारी परिसरातील गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या कोळ्याची वाडी परिसरामध्ये चारा आणि पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारा हरणाचा कळप कायमच फिरत असतो

मंगळवारी दुपारी याच परिसरात  पाण्याच्या शोधार्थ फिरत असलेल्या हरणाला म मोकाट कुत्र्यांनी गाठले व या हरणाला जखमी केले त्याच वेळी तेथे मेंढ्या चारत असलेले मेंढपाळ नवनाथ माहांडुळे, कृष्णा महांडुळे,

लक्ष्मी महांडुळे यांनी तात्काळ या हरीणाकडे धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून त्याला वाचवले व जखमी हरणाला पोत्याची झोळी करून घरी घेऊन आले याबाबत वन्यजीव प्रेमी श्री संत सावता माळी युवक अध्यक्ष अशोक तुपे यांना  माहिती कळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली

प्राथमिक उपचार करून वन विभागाशी संपर्क साधला परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले त्यानंतर वांबोरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.  टी. ठवाळ व राजेंद्र तेलोरे यांनी उपचार करून नंतर डिग्रस येथे नेण्यात आल्याचे समजते.