उपवास आरोग्यासाठी असतो फायदेशीर ! जाणून घ्या उपवासाचे फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-आधुनिक आहाराने अनेक व्याधींना जन्म दिला. लठ्ठपणा, उच्च रक्‍तदाब, हृदयरोग, मधुमेह आणि तणाव, ज्यामुळे आपलं जीवन दुर्धग झाले आहे. यास जबाबदार इतर कोणी नसून आपणच आहोत.

कारण आपण चबीचे गुलाम झालो आहोत. आजारी पडल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा सगळ्यात आधी नियंत्रण ठेवण्यास डॉक्टर सांगतात. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट झटपट हवी आहे, त्यापैकीच एक म्हणजे फास्ट फूड. फास्ट फूडमुळे आपला स्वादिष्ट आणि आरोग्यदायक देशी आहार दूषित झालाय.

यामुळे आपण आजारी आणि आळशी बनतोय. या फास्ट फूडसंस्कृतीला बघता, आपल्या देशात एक अत्यंत उपयुक्‍त धार्मिक परंपरा आहे, ज्यास उपवास किंवा व्रत असं म्हणतात. छान लागतं म्हणून आपण पोटाच्या वर खातो, पण यामुळे आपली पचन यंत्रणा अस्ताव्यस्त होते. आतडी आजारी पडतात.

उपवास करण्याने पोटाच्या आतील अवयव म्हणजे आतडी, यकृत, पित्ताशय यांना थोडा आराम मिळतो. त्याचबरोबर त्याची कार्यकुशलता वाढते. साधकांच्या मते, उपवास करण्याने व्यक्ती मधील धैर्य, संयम, आत्मबल विकसित होते. आठवड्यातील एक दिवस घरातील सर्वांनी उपवास केला, तर आरोग्याबरोबरच अन्नाची बचत होईल.

लालबहादूर शाखांना या नियमाला आपलंसं केल होत. महात्मा गांधींचाही उपवासाला पाठिंबा होता, ते मौन व्रतही ठेवत असत. आधुनिक वैद्यकशास्र आणि आयुर्वेद दोन्हीने उपवासाला समर्थन दिले आहे.

या शास्त्रानुसार, उपवास करण्याचा रोगांचा समूळ नाश होतो. थोडक्यात, उपवासाचे फायदे अनेक आहेत, म्हणून आपल्या जीवनात उपवासाला स्थान द्यायला हवे. तरीही मधुमेह, रक्‍तदाब आणि एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्‍तींनी सावधगिरी बाळगायला हबी. गर्भवती महिला आणि छोट्या मुलांनी उपवास करू नये.