file photo

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कुकडीच्या ३९५० कोटीच्या सुधारीत प्रकल्प आराखड्यास मंजुरी दिली. यामध्ये डिंबे माणिकडोह जोड बोगद्याचा समावेश होता.

त्यामुळे बोगद्याच्या कामासंदर्भात शरद पवार यांना भेटण्याऐवजी ज्यांनी बोगद्याच्या कामात आडवा पाय घातला आहे, त्यांना शेलारांनी भेटावे असा टोला आमदार बबनराव पाचपुते यांनी लगावला आहे.

पाचपुते पुढे म्हणाले कि, श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी घोड भीमेच्या पाण्यात लक्ष घातले. जलसंधारणाची कामे केली, त्यामुळे दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलले.

जनतेने सात वेळा आमदार केले आहे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काम करत आहे. पण ज्यांना साधे ग्रामपंचायत सदस्य होता आले नाही त्यांच्यावर अधिक काय बोलायचे असा प्रश्न आहे .

कुकडीच्या पाण्यासाठी मला जबाबदार धरता हे बरोबर आहे. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. कुकडी पाणलोट क्षेत्रातील पाऊस बंद झाला म्हणून येडगावचे आवर्तन बंद झाले.

माणिकडोह धरणात पाणी कमी असल्याने ते सोडता येत नाही हे समजून घेतले. मी सिनीयर आमदार आहे. विरोधासाठी विरोध करणे बरोबर नाही .

पण काहींनी पत्रकबाजी करुन लुडबुड केली सरकार त्यांचे असताना का पाणी सुटले नाही, मग उगीच दिशाभुल कशासाठी करता! असेही पाचपुते म्हणाले