पोस्ट ऑफिसच्या “या” योजनेत गुंतवणूक करून दरमहा करा उत्तम कमाई !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheam : आजही देशातील बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस योजनेवर अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिसची सुविधा अगदी तुम्हाला गावोगावी पाहायला मिळते. या गुंतवणुका सुरक्षित मानल्या जातात. म्हणूनच सर्वसामान्य लोकं येथे गुंतवणूक करणे पसंद करतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करुण चांगला परतावा मिळवू शकता. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती मासिक उत्पन्न योजना.

तुम्ही बाजारातील जोखीम घेऊ इच्छित नसाल तर, येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला दरमहा हमी परतावा मिळतो. या कारणास्तव, देशातील बरेच लोक पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याला तुम्ही एक प्रकारची पेन्शन योजना देखील म्हणू शकता. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया-

सध्या या योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक ६.६ टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही किमान रु 1,000 आणि कमाल रु 4.5 लाख गुंतवू शकता.

जर तुम्ही 4.5 लाख रुपये गुंतवलेत. या परिस्थितीत, तुम्हाला 6.6 टक्के वार्षिक परताव्याच्या आधारावर दरवर्षी एकूण 29,700 रुपये मिळतील. या प्रकरणात, तुम्हाला दरमहा 2,475 रुपये मिळतील.

दुसरीकडे, या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडल्यास. अशा परिस्थितीत तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकूण 9 लाख रुपये गुंतवू शकता. या प्रकरणात, तुम्हाला 6.6% च्या वार्षिक रिटर्नसह दरवर्षी 59,400 रुपये मिळतील.

या स्थितीत तुम्हाला दरमहा ४,९५० रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसची ही योजना पाच वर्षांसाठी आहे. त्याच वेळी, तुम्ही ते आणखी पाच वर्षांपर्यंत वाढवू शकता.